मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:05 IST)

महागाई दर्शवणारे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

पुणे - क्या यही हैं अच्छे दिन ? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन सुरू केले आहे. वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी शहराच्या विविध भागात महागाई दर्शवणारे फलक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले आहेत.
 
शहरात कोथरूड, नळस्टॉप, डेक्कन, शिवाजीनगर, सेनापती बापट रोड, चांदणी चौक, बावधन, चतुशृंगी येथील पेट्रोल पंपावर हे फलक लावण्यात आले. या फलकांवर 2015 वर्षी असणारे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर आणि 2021 मधील दर यातील तफावत दर्शवली आहे.
 
गिरीश गुरनानी म्हणाले, ‘अच्छे दिन’ आणणार असल्याच्या भुलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार जीवनावश्‍यक वस्तुंची दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करीत आहे. 2015 ते 2021 या काळात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस च्या किमतीचा दर वाढत गेला. तो वाढतोच आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे.
 
गुरनानी पुढे म्हणाले, ‘कोविड काळामध्ये जनतेला धीर देण्याऐवजी ‘अच्छे दिन’च्या नावाखाली इंधन दरवाढ करून मोदी सरकार जनतेची लुबाडणूक करत आहे.