भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे निधन झाले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.त्यांना डेंग्यूची लागण झाली होती.
प्रभाग क्रमांक 23, शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगरमधून अर्चना बारणे भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. पहिल्यांदाच त्या निवडून आल्या होत्या. त्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व आणि ग प्रभाग कार्यालयाचे अध्यक्षपदही भुषविले आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.