प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट लिहून,विहिरीत उडी मारून केली आत्महत्या
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुकवर बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी अशी पोस्ट लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.प्रफुल्ल दादाजी मेश्राम वय 45 (रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कात्रज परिसरात राहणारे प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते.ते मध्यंतरी एका आजारातून बरे होऊन बाहेर पडले होते.त्यानंतर सर्व ठीकठाक सुरू होते.मात्र मागील काही दिवसात प्रफुल्ल हे मानसिक तणावात होते.
त्याच दरम्यान त्यांनी “बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी”अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आणि पुरंदर येथील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडून मारून आत्महत्या केली.ही पोस्ट त्यांच्या मित्र परिवाराने वाचताच,त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याला समोरून काही प्रतिसाद मिळत नव्हता.या प्रकारामुळे सर्वांनी शोधाशोध सुरू केली.पण काही वेळाने एका व्यक्तीने विहिरीत आत्महत्या केल्याची पोलिसांना मिळताच घटनास्थळी पाहणी केल्यावर, तिथे गाडी,चावी,पॉकेट आणि रुमाल ठेवल्याचे दिसून आले