मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (08:22 IST)

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा ‘जनसंवाद’

पूर्णानगर विकास समितीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पुण्यातील हयात हॉटेलमध्ये उद्या, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कोरोना नियमांचे पालन करून निवडक मान्यवर आणि नागरिकांना या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.

सध्याची कोविड परिस्थिती,केंद्र आणि राज्य स्तरावरील राजकीय घडामोडी,मराठा,ओबीसी आणि मुस्लिम आरक्षण आदी विविध विषयांवर नागरिकांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर मंत्री आठवले यांच्या खास शैलीतील उत्तरे ऐकण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती विकास गर्ग यांनी दिली.