1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2017 (11:17 IST)

बँकेचे एटीएम घेवून चोरटे गेले

एटीएम फोडून चोरी अनेकदा होते. मात्र चोरांनी चक्क हे मशीनचा चोरून नेले आहे.  अहमदनगरला येथे ही

घटना घडली आहे.बँक ऑफ महाराष्ट्रचं  एमआयडीसी परिसरातील एटीएम होतं. त्यामध्ये तब्बल 2 लाख 33 हजाराची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हे पूर्ण मशीन घेवून चोरटे फरार झाले आहेत. 

हे पोर्टेबल एटीएम मशीन होते. या मशीनची चोरी  बुधवारी रात्री केली आहे. मात्र हा सर्व प्रकार  गुरुवारी दुपारी एटीएम गायब झाल्याचं बॅक प्रशासनाच्या लक्षात आला होता. 

एटीएममधला सीसीटीव्ही कॅमेरा  चोरट्यांनी आधी  तोडला आणि नंतर एटीएम मशीन  स्कॉर्पिओ गाडीत टाकून ते पळून गेले आहेत.   परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही चोरी कैद झाली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.