1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:51 IST)

नळाचे पाणी भरण्यावरून एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

attempt to kill a man over filling tap water in Nasik
नळाचे पाणी भरण्यावरून नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे झालेल्या मारहाणीत एक जण जबर जखमी झाला आहे.
 
या प्रकरणी अर्चना सुनील येळंजे (वय 32, रा. हिसवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संभाजी दामू जगताप याने पाणी भरण्यावरून कुरापत काढली. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेला अर्चना येळंजे यांचा भाऊ कृष्णा रमेश जगताप यालाही संभाजी जगताप याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूसदृश हत्याराने छातीवर व डाव्या हातावर वार केले.
 
अर्चना येळंजे वडील रमेश बाबूराव जगताप यांनाही संभाजी जगताप याने लोखंडी कुर्‍हाडीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर अर्चना यांच्या पायावर बांबूचे फटके दिले. या मारहाणीमुळे संतप्त होऊन अर्चना येळंजे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी भा. दं. वि. कलम 307, 326, 324, 323 व 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला.
Edited by:  Ratnadeep Ranshoor