शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (09:53 IST)

मुंबई महामार्गावर कंटेनरमधून 3 कोटींची तंबाखू जप्त

Mumbai-Nashik Highway
मुंबई-नाशिक महामार्गावर पोलिसांनी नुकताच तीन कंटेनरमधून तीन कोटी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही कंटेनरचालकांना अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गुटखा व बंदी असलेल्या तंबाखूची आवक होत असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक येथील येवई गावातील शामियाना ढाब्यासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर छापा टाकत तीन कोटी 55 लाख 14 हजार रुपयांची तंबाखू जप्त केली.
 
पोलिसांनी याप्रकरणी या कंटेनर चालक ताहिर सिताब खान, मोहम्मद तारिफ हबीब खान, जाहुल यासीन हक (सर्व रा. राजस्थान) यांना ताब्यात घेत त्यांच्यावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव करीत आहेत.

Edited By-Ratnadeep Ranshoor