शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (09:31 IST)

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

shivaji adhalrao patil
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत श्री. आढळराव पाटील यांनी आज सदर पदभार स्वीकारला. यावेळी म्हाडाचे कार्यकारी अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.
 
म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल, असा विश्वास उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Edited By - Ratnadeep Ranshoor