संबंधित माहिती
- उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे. भ्रष्टाचारी कोणते सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे
- नीलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा
- महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी
- 'महाराष्ट्रात गुंडाराज'? राजकीय नेत्यांना गुन्हेगारांची गरज का भासते?
- अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिसभाई काय म्हणाला होता?
मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन-झिशान सिद्दीकी
Photo- Instagram
एकीकडे काँग्रेसला गळती लागली असताना दुसरीकडे नेते पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेसारखी दुटप्पी पार्टी आजपर्यंत नाही बघितले. जेव्हा वज्रमुठ सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे येऊन म्हणतात की माझ्या हिंदू बांधव आणि भगिनी. बाबरीविषयी विधाने करतात. आम्ही बीकेसीच्या एकाच मंचवर बसलो होतो. लाज वाटते का? अशा पक्षांसोबत काँग्रेस कशी जाऊ शकते? भारत जोडो यात्रेत गेलो तर मला हाकलून दिले. राहुल गांधी यांची टीम फार वाईट आहे, या शब्दांत काँग्रेस नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पक्षाबाबतची मते तीव्र शब्दांत व्यक्त केली.
मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, त्यांचा फोन मी उचलला नाही. त्यांनी आधी आपला मतदारसंघ बघावा. ज्या गोष्टी सुरु आहेत त्यामुळे काँग्रेसची अल्पसंख्यांक मते कमी होतील. त्यांना जर आमची गरज नसेल तर आमचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. जर आधी विचारले असते की, काँग्रेसमध्ये राहणार का? तर हो म्हणालो असतो पण आता सांगू शकत नाही की काँग्रेसमध्ये राहीन. काँग्रेसला आमची गरज नाही मग मी पक्षात राहून काय करू? आम्हाला पर्याय आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
Edited By - Ratnadeep Ranshoor
