सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (09:24 IST)

उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे. भ्रष्टाचारी कोणते सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे

ramdas kadam
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत, आता उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे. भ्रष्टाचारी कोणते सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले  पाहिजे, अशी मागणी केली आहे.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे गटासह उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. पण उद्धव ठाकरे सातत्याने त्यांच्यवर टीका करतात. आमची मंत्रिपदे काढली. ज्यांच्या भाषणाला जास्त टाळ्या येतील, त्यांना दूर केले. भाषणे बंद करून टाकली. माझी आमदारकी काढली. माझे मंत्रिपद काढले. मी मिठाई देण्यात कमी पडलो, नाहीतर मंत्री असतो. रवींद्र वायकर का मंत्री झाले? हे वायकरांनी सांगावे? दिवाकर रावतेही सांगू शकतील, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor