भंडारा मध्ये ३० वर्षीय नराधमाकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न
महाराष्ट्रातील भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात ६ ऑगस्ट रोजी म्हणजेच काल तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात एका ३० वर्षीय नराधमाने ३ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आरडाओरड केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपीला रंगेहाथ पकडले आणि त्याला चोप दिला. या घटनेच्या निषेधार्थ ७ ऑगस्ट रोजी संपूर्ण भंडारा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
रोहित वासनिक असे आरोपीचे नाव असून तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. माहितीनुसार भंडारा शहरातील एका सार्वजनिक शौचालयात मुलीला आमिष दाखवून नेण्यात आले होते. चिमुकलीचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक धावून गेले. त्यांनी नराधमाला पकडून चोप दिला, ज्यात आरोपी देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ALSO READ: मुंबई 'मिसिंग लिंक' बोगद्यात भीषण अपघात, फॉर्च्युनरने टेम्पोला धडक दिल्याने व्यावसायिकचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik