बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (14:43 IST)

औरंगाबाद : उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू

घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा अघटित घडू शकते. औरंगाबादच्या हसनाबाद येथे उकळत्या वरणात पडून 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगीराज नारायण आकोदे असे या मृत्युमखी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. योगीराज हा चिमुकला आपल्या आईसह खुलताबाद तालुक्यात सोबलगावंच्या प्रदीप जाटवे यांच्याकडे आला होता. घरात काही कार्यक्रम असल्याने पाहुणे आल्याने घरात स्वयंपाक सुरु असताना हा चिमुकला खेळत खेळत वरणाच्या भांड्याजवळ आला आणि त्याचा तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. या घटनेत योगीराज गंभीररीत्या भाजला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
Edited By - Priya Dixit