1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (10:15 IST)

औरंगाबादमध्ये लस नाही, तर दारू नाही

aurangabad
लसीचा किमान एक डोस घेतल्या शिवाय आता दारू तर मिळणार नाहीच, मात्र बारमध्ये बसूनही दारू पिता येणार नाही. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच गोची झालीये. यापूर्वी पेट्रोल, गॅस, किराणा, कपडे खरेदीसाठी लसीकरण सक्तीचं करण्यात आलं होतं. तरीही टक्का वाढत नसल्यानं प्रशासनानं थेट दारू खरेदीसाठीही लसीची अट घातलीय. इतकंच नव्हे तर हॉटेलमध्येही लस घेतलेल्या ग्राहकांनाच सेवा दिली जाणार आहे.
 
औरंगाबादमध्ये मद्यप्रेमींनी नवीन नियमाचा धसका घेतलाय. तर दारू दुकानदारांनी या नियमाला विरोध केलेला नाही. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात कोरोना लसीकरणाचा टक्का घसरलाय. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.