गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (19:16 IST)

औरंगाबादेत युवक युवतीचा लिंबाच्या झाडाला गळफास

औरंगाबादमधील अजिंठा पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. लिंबाच्या झाडाला गळफास केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही जळकीबाजार येथील रहिवासी होते. दोघेही सोमवारी शेतात गेले आणि दोघांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन सोबतच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. 
 
त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. अंजिठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.