रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:03 IST)

महिलेचा खून करून तिचा मृतदेह गटारीत फेकला

नगर येथे एका 40 वर्षीय महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गटारीच्या एका टाकीमध्ये फेकून दिल्याची घटना काल दुपारी नाशिक – पुणे महामार्गावरील घुलेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या माझे घर हौसिंग सोसायटीजवळ श्रमिक बीडी कामगार वसाहतीच्या मोकळ्या जागेत उघडकीस आली आहे.माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक विडी कामगारांच्या वसाहती जवळ असलेल्या एका सेफ्टी टँक मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. दुपारी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह सेफ्टी टँक च्या बाहेर काढला. पोलिसांनी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
सदर महिलेची ओळख पटू शकली नाही. तिचे वय 40 असल्याचे समजते.अज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह या पाण्यात टाकलेला आढळून आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले अधिक तपास करीत आहेत.