बुधवार, 12 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:56 IST)

'गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही' - नारायण राणे

'I will not tolerate betrayal' - Narayan 'गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही' - नारायण राणे Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
"पक्षात प्रत्येकाला संधी मिळते पण एकाला मिळाल्यास त्याला पाडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही हक्काने मागा. मी पद नक्की देईन; मात्र गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही." असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात नारायण राणे यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा घेतली. सावंतवाडी आणि कुडाळ इथल्या दोन आमदारांसह खासदार आपला नाही याचे शल्य आहे असंही राणे म्हणाले. या तिन्ही जागा मिळवण्यासाठी कामाला लागा असं आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "आपण मुख्यमंत्री असताना मुंबईत गुंडांची दहशत होती, पाकिस्तानातून हल्ले व्हायचे पण तरीही ती दहशत मी मोडून काढली. आताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये तेवढी धमक आहे का?" असं राणे म्हणाले.
तालुक्यातील सत्तास्थानं मिळवण्यासाठी कामाला लागा अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यासाठी आवश्यक तेवढी मदत केली जाईल असंही ते म्हणाले.