गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (13:07 IST)

ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

Kirtankar Baba Maharaj Satarkar Death
प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज गुरुवारी पहाटे सहा वाजता निधन झालं आहे. महाराज 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे फड परंपरेतील समुदायावर तसेच राज्यातील वारकरी संप्रदाय परंपरेतील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराजांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असं कुटुंब आहे. 
 
महाराज यांचं पार्थिव आज दुपारी तीन वाजेनंतर अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल. 
 
5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. 
 
बाबा महाराज सातारकर यांनी त्यांच्या जीवनात विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील कीर्तने केली. त्यांचे कीर्तन एकण्यासाठी हजारोच्या संख्येने समुदाय जमत असे. आता त्यांचा नातू त्यांची कीर्तनाची ही परंपरा पुढे नेत आहे.