शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (15:58 IST)

बाबो! कार पेक्षा मेंढ्या महाग !

एका मेंढीला दोन लाखापेक्षा अधिक किंमत मिळू शकते यावर विश्वास  बसणं अशक्य आहे. पण असेच घडले आहे सांगलीच्या माडग्याळ बाजारपेठेत. येथे मेंढीला दोन लाख तैतिस हजार एवढी किंमत मिळाली आहे. या माडग्याळच्या बाजारात बऱ्याच प्रमाणात मेंढ्या विकण्यास येतात. या मेंढ्याना खूप मागणी आहे. माडगळ्यातील मेंढी चांगल्या रुबाबदार नाक आणि विशिष्ट चव आणि स्वादाच्या मांस साठी प्रसिद्ध आहे. या मुळे या मेंढ्याना खूप मागणी आहे. या माडग्याळ मेंढ्या सांगली जिल्ह्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ, सिद्धनाथ भागात आढळतात. येथे सांगलीच्या जत तालुक्याच्या माडग्याळ मध्ये मायाप्पा चौगुले नावाच्या शेतकऱ्याची सहा मेंढे 14 लाखाला विकली गेली. या मेंढ्या लाखांच्या भावात विकल्या गेल्याने शेतकरी मायाप्पाच्या आनंदाला पारावर नव्हता. त्यांनी गावात हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली.