1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (15:24 IST)

बाळाची 3.5 लाख रुपयांत विक्री

महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एक वर्षाच्या बाळाची विक्री केल्याचं धक्कादायक प्रकरण बीड जिल्ह्यातील बाजलगाव येथे घडले आहे.
 
पतीपासून वेगळी राहात असलेल्या महिलेच्या एक वर्षाच्या बाळाची तब्बल 350000 रुपयांना विक्री करण्यात आली होती. मात्र पोलिसांद्वारे तत्काळ कारवाई करण्यात आली असून पाच आरोपींना अटक केली गेली आहे. बाळ सुखरुप आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
 
माहितीनुसार एका 20 वर्षीय तरुणीला प्रेमसंबंध असल्याच्या शंकेवरुन पतीने वेगळं केलं. महिला आपल्या बाळासोबत माहेरी माजलगाव येथे राहात होती. जेथे छाया नावाच्या महिलेचं येणेजाणे होते तेव्हा तिने बुलढाणा येथील वासुदेव भोजनेसोबत तिचे दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दिली. दरम्यान, छायाने मध्यस्थी करत कोल्हापूर येथील ललिता नावाच्या महिलेशी संपर्क साधत ग्राहक शोधून मुलाची विक्री केली. बाळ तब्बल 350000 रुपयांना विक्री केले गेले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे.
 
आरोपीची नावे छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक), आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे), स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा) असे आहेत.
 
दरम्यान प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोपी ललिता व दीपक हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.