संबंधित माहिती
- मोठी बातमी , हैदराबाद प्राणी संग्रहालयातील 8 सिंहांना कोरोनाची लागण
- माकडांचा Valentine’s Day
- दुर्मीळ प्रजातीच्या माकडाच्या पिल्लूचं व्हिडिओ व्हायरल
- Zoom call with goat गमतीगमतीत केली 50 लाखांची कमाई
- Forbes 2020 List: निर्मला सीतारमण, रोशनी नादर, किरण मजूमदार जगातील 100 सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत
चला फिरायला जाऊया, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय झाले खुले
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालाय आणि उद्यान पर्यटकांच्या सफारीसाठी आजपासून सुरू झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च अखेरीस गोरेवाडा उद्यानातील सफारी बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नागपूर लेव्हल वनमध्ये असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले.
कोरोनाबाबतचे नियमांचे पालन करत आज पर्यटकासाठी सफारी सुरू झाली. पहिल्या सफरीपासूनच पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सफाररीत राजकुमार वाघाने दर्शन दिले. त्याची रुबाबदार बैठक पाहून पर्यटक खुश झाले. 5 अस्वल एकत्र मस्ती करताना आढळून आले. तर चार बिबट्या खेळताना पाहन्याचा आनंदही पर्यटकानी लुटला. पहिल्या दिवशी 150 सफारी बुकिंग झाल्या आहेत. मुंबई आणि शेजारील राज्यातूनही पर्यटक सफरीला पोहचले आहेत.
