बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (15:10 IST)

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचेच नवे तर, देशाचे गुरू : संजय राऊत

sanjay raut
गुरू हा नेहमीच मोकळ्या हाताने सर्वकाही देत असतो. तशीच बाळासाहेब ठाकरे यांनी मोकळ्या मनाने उधळण केली. असा गुरू होणे नाही. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचेच नवे तर, देशाचे गुरू होते. त्यामुळे प्रत्येक दिवशी आम्हाला या गुरूचे स्मरण होते”, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन केले.
 
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. “काही लोक शिवसेना सोडून बाहेर गेले आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरू. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर बंडखोरांचा समाचार घेतला असता”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवाय, “बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरू असल्याचं सांगत आहेत, याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं”, असेही ते म्हणाले.
 
“बाळासाहेब आमच्यासाठी तेजस्वी नेते होते. गुरुमध्ये तेज असलं पाहिजे; जे आपले भक्त, शिष्य, समर्थकांना दिशा देईल. ते सर्व बाळासाहेबांमध्ये होतं. आमच्यासारखे लाखो शिवसैनिक त्यांना गुरू मानत होते. राज्य आणि देशातील लोकांनीही त्यांना गुरुस्थानी ठेवलं होतं. निष्ठेच्या बंधनाने बाळासाहेबांनी सर्वांना एकत्र ठेवलं होतं”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.