शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:12 IST)

बाप्परे , गाढवाने चिमुकलीच्या डोक्याचा चावा घेतल्याने ती गंभीर जखमी

donkey
साताऱ्यात  एका गाढवाने चिमुकलीच्या डोक्याचा चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. यासगळ्या प्रकारानंतर गाढवाच्या मालकावर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये साताऱ्यातील खटाव तालुक्यात मायणी येथे तीन वर्षांच्या मुलीच्या डोक्याला गाढवाने चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. गाढवाने चावा घेतल्यानंतर जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी कऱ्हाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गाढव मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मोकाट जनावरांबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
गंभीर जखमी झालेली मुलगी हातात पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर उभा असलेल्या गाढवाने तिच्या डोक्याचा जोरदार चावा घेऊन तिला फरफटत नेले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी तिची सुटका केली. मात्र गाढवाने त्या चिमुकलीला इतक्या जोरात चावा घेतली ती तिच्या डोक्याचे मास निघाले. त्यामुळे मुलीच्या डोक्याचा वरचा भाग रक्तबंबाळ झाला होता. जखमी झालेल्या मुलीला तात्काळ लोकांनी कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.









































Edited By - Ratnadeep Ranshoor