रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (17:34 IST)

Beed : जवान पांडुरंग वामन तावरे सिक्कीम मध्ये शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

RIP Pandurang Vaman Taware: बीडच्या पाटोदा तालुक्यातील काकडहिरा गावाचे सुपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे यांना चार दिवसांपूर्वी सिक्कीम मध्ये झालेल्या ढगफुटीत वीरमरण आले. सिक्कीम मध्ये गंगटोक परिसरात तिस्ता नदीला ढगफुटी मुळे पूर आला. या पुरात भारतीय सैन्य दलाच्या तुकडीचे 23 जवान वाहून बेपत्ता झाले.

या पुरात वाहून गेलेल्या 23 जवानांपैकी एक बीडच्या पाटोदा तालुक्यातील काकड हिरा गावातील जवान पांडुरंग वामन तावरे देखील शहीद झाले. आपत्कालीन परिस्थितीत देशसेवेचे कर्तव्य बजावताना ते शहीद झाले. त्यांचे मृतदेह शोधल्यानंतर तावरे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी आणण्यात आले. 

आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. या वेळी शहीद पांडुरंग अमर रहेच्या घोषणा केल्या. त्यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. शहीद पांडुरंग तावरे यांना अश्रुपूर्ण निरोप देण्यात आला.    
 
























Edited by - Priya Dixit