मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 मे 2022 (11:56 IST)

आंतरजातीय विवाह केल्याने मारहाण

crime
आंतरजातीय लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या आईवडिलांनीच मुलीला मारहाण केली आणि तिला नवर्‍याच्या घरातून अक्षरश: फरफटत आणले. ही घटना अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातल्या अंबाडा गावात घडली आहे. 
 
मुलीला आईवडिलाच्या तावडीतून पोलिसांनी सोडवले
मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याने चिडलेल्या आईवडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण केली आहे. येथे 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येते आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी 4 मे रोजी घरातून मुलाकडे निघून गेली. आईवडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे पोहोचले आणि त्यांनी मुलीला मारहाण करत परत घरी आणले.तसेच पोलिसांनी करावाई करत मुलीला आईवडिलांच्या ताब्यातून सोडवले.