गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (13:23 IST)

बीड : खेळताना चिमुकलीचा मृत्यू

बीडच्या गेवराई तालुक्यातील खेरडावाडी गावा मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळताना मेकअपचा आरसा अंगावर पडून 5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. आरोही गोपाळ भिसे असे या मुलीचे आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, पाच वर्षाची आरोही घरात खेळत असताना सोफ्यावरून चढून बांगड्या ठेवताना मेकअपच्या आरशाच्या हुकात ठेवताना हातातील बांगडी अडकून मेकअपचा आरसा तिच्यावर पडला आणि काचेचे तुकडे इकडे-तिकडे पसरले आणि त्यातील एक काच तिच्या गळ्यात घुसला तिचा आवाज ऐकून  घरातील सर्व मंडळी आतल्या खोलीत आले आणि तिच्या गळ्यातील काच काढला आणि तातडीने  तिला रुग्णालयात नेण्यात आले असता वाटेतच तिचा मृत्यू झाला.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
  Edited By- Priya Dixit