गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्यात बीडमध्ये उष्माघाताचा बळी

राज्यात बीडमध्ये या उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रुपाबाई पिसळे (67) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुपाबाई पिसळे बीड येथे आल्या असता दुपारी त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

रात्री साडे 9 च्या सुमारास त्या नागरिकांना मृत अवस्थेत आढळल्या.पोलीसांना घटनेची माहिती समजताच पंचनामा करुन मतदान कार्डच्या आधारावर रुपाबाई यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली.