शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (21:52 IST)

बेस्ट कामगारांना मिळणार एवढी वेतनवाढ; शुक्रवारी बोनसही होणार

st buses
मुंबई – बेस्ट कामगारांसाठीच्या वेतन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार असून दिवाळीचा बोनस २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती भाजपा बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके व सरचिटणीस गजानन नागे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बेस्ट कामगारांसाठीचा २०१६ ते २१ चा करार नुकताच करण्यात आला असून त्यानुसार कामगारांना ६ हजार ५०० ते ११ हजार ५०० एवढी वेतनवाढ मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीही बेस्ट कामगारांना लागू झाल्या आहेत. नव्या वेतनाची थकबाकी कामगारांना देण्यात येणार आहे.
 
या करारावर कामगार संघातर्फे अध्यक्ष श्री.गणेश हाके, सरचिटणीस श्री. गजानन नागे तर बेस्ट प्रशासनातर्फे महाव्यवस्थापक श्री.लोकेश चंद्र, व्यवस्थापक श्री.रवींद्र शेट्टी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावर्षीच्या दिवाळीसाठीचा बोनस शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केले, असेही श्री.हाके यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor