शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (07:55 IST)

लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, तू तर चारित्र्याबद्दल बोलूच नको - मेहबूब शेख

chitra wagh
लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, तू तर चारित्र्याबद्दल बोलूच नको, अशा खालच्या शब्दांत राष्ट्रवादी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
 
मेहबूब शेख यांनी एक्स (X) या सोशल मीडिया हॅंडलवर एक व्हिडीओ ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मेहबूब शेख म्हणाले की, सध्या एक लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको जिला प्रसिद्धी हवी असते, ती गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला बोललं की तिला महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर तिचं तोंड उघडलं, भाषा ऐकली की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तिची भाषा माहिती आहे. तिची भाषा ही महिला आणि बाईपणाला शोभणारी आहे का, हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते. ती बाई संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या शब्दांत बोलते. पण सुप्रियाताई महिला नाहीत का? त्यांच्यावर टीका करताना सुसंस्कृत भाषेत टीका करा. भाजपच्या इतर महिला नेत्या योग्य भाषेत टीका करत असतात, कारण त्या सुसंस्कृत आहेत.
 
आज तू सुप्रियाताईंच्या वांग्याचा हिशोब सांगते, एवढाच हिशो जर माहिती होती, तर 2001 ते 2019 पर्यंत तू सुप्रियाताईंच्या शेतात वांगी तोडायला होतीस का? त्यावेळी हे आठवलं नाही का? 2001 ते 2019 पर्यंत सुप्रियाताईंच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या. आज त्यांच्यावर तू टीका करतेय, बरं टीका करताना शब्द कोणते वापरते? असं मेहबूब शेख म्हणाले.
 
सुप्रिया सुळेंनी आपला हिशेब निवडणूक आयोगाला दिला आहे. पण तुझ्या नवऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली तेव्हा उत्पन्ना स्त्रोतापेक्षा जास्त उत्पन्न आढळंल. त्यात दोन फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट कुठून आले? तू सुपाऱ्या घेऊन बदनामी करते त्याचे हे फ्लॅट आहेत का, अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली.