सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (12:26 IST)

Bhiwandi Accident : कंटेनर आणि जीपचा अपघातात सहा जणांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई -नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनर आणि प्रवाशी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 6 प्रवाशी मृत्युमुखी झाले आहे. 
काली पिवळी प्रवाशी जीप प्रवाशांना घेऊन मुंबई नाशिक मार्गाने जात असताना भिवंडी तालुक्यात खडवली गावाच्या क्रॉसिंगवर समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की जीप सुमारे 60 ते 70 फुटावर फेकली गेली. ही घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. 
 
या अपघातात सहा प्रवाशी जागीच ठार झाले आहे तर पाच प्रवासी जखमी झाले आहे. चिन्मय विकास शिंदे, रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे संतोष अनंत जाधव, वसंत धर्मा जाधव, प्रज्वल शंकर फिरके अशी मयतांची नावे आहेत तर दिलीप कुमार विश्वकर्मा, चेतना गणेश, कुणाल ज्ञानेश्वर भरमे अशी जखमींची नावे आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जीप मधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आणि अपघातात मृत्युमुखी झालेल्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 
 
Edited by - Priya Dixit