शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:41 IST)

भोंदू ज्योतिष्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता

नाशिकमध्ये उच्चभ्रू भागात पोलिसांनी गजाआड केलेल्या भोंदू ज्योतीषीली न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या भोंदू ज्योतिष्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. या भोंदू ज्योतिषाचे नाव गणेश बाबुराव जोशी असे असून तो मुळचा मुंदखेडा, ता- जामनेर, जि- जळगाव येथील रहिवासी आहे. या भोंदू ज्योतिषाची हाय प्रोफाईल टोळी असून किंमती वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहीराती देऊन फसविणे असे कामे तो करत होता. हा भोंदू आपले नाव व मोबाईल नंबर बदलून त्यांचे फसवणूक करण्याचे कारनामेही आता पुढे येत आहे.
 
गंगापुर रोडच्या जेहान सर्कल येथे त्याने भाड्याचे कार्यालय घेतले होते. अनेक दिवसांपासून तो त्या ठिकाणी राहून लोकांना फसवत होता. लोकांच्या श्रध्देचा फायदा घेत तो अघोरी उपचार सांगत लाखो रूपये लुटत होता. ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर आम आदमी पार्टी सोबत सापळा रचला व भोंदू ज्योतीषाचा भांडाफोड केल्याची माहिती अनिसने दिली आहे..आता भोंदूबाबाच्या कार्यालयात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची तपासणी करणे, त्याच्या साथीदारांची माहिती मिळवणे या बरोबरच त्यांचे रॅकेट शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. अशी कुणाची फसवणूक झाली असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डॅा. टी.आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, अॅड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे ,जितेंद्र भावे, कस्तुरी आटवणे, जगदीश आटवणे, सोमा कुर्हाडे यांनी केले आहे.