1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Bhondubaba Ashok Kharat folded his hands in front of the judge today

अशोक खरातने न्यायाधीशांसमोर हात जोडले

भोंदूबाबा अशोक खरातने आज न्यायाधीशांसमोर हात जोडले. ही आज  २ एप्रिल रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार भोंदूबाबा अशोक खरात याला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ८ एप्रिलपर्यंत ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तसेच सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. न्यायाधीशांनी त्याला “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” असं विचारलं. यावर खरातने हात जोडून “काही नाही” असं उत्तर दिलं. यापूर्वी आवाज कमी आल्याने न्यायाधीशांनी मोठ्याने बोलण्यास सांगितलं होतं.
अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल आहे. महिलांचा लैंगिक शोषण, फसवणूक, ब्लॅक मॅजिक, नरबळी संशय इत्यादी. त्याला आधी १४ दिवस न्यायालयीन कोठडी झाली होती आणि आता आणखी पोलिस कोठडी मिळाली आहे. SIT (विशेष तपास पथक) त्याच्या प्रकरणांचा तपास करत आहे. तसेच खरातचे प्रकरण आता महाराष्ट्रात मोठ्या चर्चेत आहे.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
आपचा मोठा निर्णय: राघव चड्ढा यांच्याकडून राज्यसभेचे उपनेतेपद काढून घेतले