1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (07:17 IST)

भोंगा, शरद पवार, पुरंदरे...राज ठाकरेंच्या सभेतील मुद्दे

raj thackeray
राज्यात सध्या राज ठाकरे यांच्या सभांची मालिका सुरु आहे. मोठ्या उत्साहाने मनसेनं पुन्हा एकदा नवी हिंदुत्वादाची इनिंग सुरु केली असून, त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच आज राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षीत औरंगाबादची सभा  सुरु झाली आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून मनसे कार्यकर्ते या सभेसाठी औरंगाबादेत दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या या सभेत ते नेमकं कुणावर निशाणा साधणार? कुणाची नक्कल करणार? भोंग्याच्या वादावर काय भुमिका घेणार? हे पाहण्यासाठी सगळेच उत्सूक होते.
 
अभी नही तो कधी नही...राज ठाकरेंचं हिंदूंना आवाहन
मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, की आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. 'अभी नही तो कभी नही' असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
 
शरद पवारांनी जातीचं विष कालवलं...
बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांना त्रास दिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला.
 
शरद पवारांमुळे जाती-जातींमध्ये दुही निर्माण झाली
शरद पवार म्हणतात की माझ्यामुळे दुही निर्माण होतेय. मात्र, शरद पवारांनी जाती-जातींमध्ये केलेल्या भेदामुळे समाजात दुही निर्माण होतेय. प्रत्येक माणसाकडे जातीमधून पाहतात. हातात पुस्तक घेतलं की लेखकाची जात पाहतात. राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तक वाचली का म्हणे...माझ्या आजोबांनी लिहीलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा मग कळेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही संदर्भ देखील दिले आहेत. राष्ट्रवादीमुळे दुसऱ्या जातीबद्दल भेद निर्माण झाला असा घणाघात राज ठाकरेंनी केले.