शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:32 IST)

देवेंद्र फडणवीस यांचा आता शरद पवारांवर हल्लाबोल; उपस्थित केले अनेक गंभीर प्रश्न

sharad panwar
भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर गेल्या काही दिवसात जोरदार टीका केली आहे. त्याची दखल घेत पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे आणि प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता फडणवीस यांनीही पवार यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस यांनी एकामागोमाग एक असे तब्बल १४ ट्विट करुन पवार यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दहशतवाद्यांशी संबंधित इशरत जहाँ निर्दोष असल्याचं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. हे तर सर्वांना आठवत असेल. आणि ते तर रेकॉर्डवरच आहे. काश्मिर फाईल्स या चित्रपटाविषयी पवारांनी केलेले मतप्रदर्शन आपण सध्या पाहतच आहोत. त्यांची भूमिका ही जातीय आधारावर आणि ध्रुवीकरणावर आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला, यासह अनेक प्रश्न उपस्थित करुन फडणवीस यांनी पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.