बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (16:38 IST)

भाजप आमदार जयकुमार गोरेंवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Jayakumar Gore
सातरा- भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयत व्यक्तीला दाखवून जमिनीचा दस्ता ऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून गोर यांच्यासह पाच जणांवर अनुसूचित जाती जमाती (ॲट्रोसिटी) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असून साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.