शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (10:04 IST)

आंबेडकर जयंतीनिमित्त 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल

petrol diesel
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापुरात आज  1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून बाबासाहेबांची पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा व बुद्धवंदना करण्यात आली. दरम्यान बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आज सोलापुरात 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे हा निर्णय मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून घेण्यात आला आहे. 
 
सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या असून दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला असून डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे.