1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Kirtankar Indurikar Maharaj's car accident

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीचा अपघात

kirtankar indurikar
जालना- कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बदनापूरहून खांडवीकडे जाताना हा अपघात झाला असून रस्ता ओलांडताना ट्रॅक्टरवर स्कॉर्पिओ आदळली. 
 
बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वाहनाला जालन्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना घडली. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी इथं कीर्तनासाठी जात असताना रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.
 
ते काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने प्रवास करत होते. या अपघात इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नाही तर गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. जखमी चालकाला शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पुढील लेख
कोकणच्या हापूस आंब्याची लासलगाव मार्गे अमेरिकेत निर्यात