बाबासाहेबांच्या स्मारकारकासाठी काँग्रेसनं जागा दिली नाही, PM मोदींनी 3 दिवसांत इंदू मिलची जागा दिली
लातूरमधील आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य 72 फुटाचा पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गिरीश महाजन, खासदार सुधाकर शृंगारे, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
नरेंद्र मोदीं जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना विनंती केली त्यानंतर इंदू मिल जागा आम्हाला मिळली त्यासाठी सुध्दा आम्हाला खुप संघर्ष करावा लागला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच इंदू मिलसाठी आमच्या सरकारने 2300 कोटी रुपये दिले, लंडणमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आमच्या काळात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
इंदू मिलसाठी जागा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, आमचे भीमसैनिक त्यासाठी तुरुंगात गेले. दोन्हीकडेही काँग्रेसचं सरकार होतं, बाबासाहेबांच्या नावानं मत मागायचे, मात्र सुईएवढी जागासुद्धा देत नव्हते. पुढे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं आणि पंतप्रधान मोदींनी जागा मिळवून दिली. 2300 कोटी रुपयांची जागा मोदीजींनी तीन दिवसांत महाराष्ट्र सरकारला दिली असं फडणवीसांनी सांगितलं.