शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (17:02 IST)

खडसे म्हणतात, दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है

khadse fadnavis
देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत झाली होती. मात्र याचा त्यांना विसर पडला. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. 
 
ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यात माझा मोलाचा वाटा आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंबरवर बसत होते. मीच माझ्याजवळ घेऊन फडणवीस यांना बसवले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.