सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (15:23 IST)

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी नाकारल्याने भुजबळ संतप्त; म्हणाले….

chagan bhujbal
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ संतप्त झाले आहे.

यावेळी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की मोर्चाला परवानगी नाही, ही धटिंगणशाही आहे. पोलीस परवानगी देत नाही की गृहमंत्रालय परवानगी देत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

पोलीस परवानगी नाकारत असेल तर गृहमंत्र्यालयाने त्यात हस्तक्षेप करावा. मोर्चाला परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघणार, लोक येणार असेही त्यांनी सांगितले. कारवाई झाली तरी चालेल. राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor