1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. big blow to Eknath Shindes Shiv Sena in Ulhasnagar

उल्हासनगरच्या नगरसेविका पूजा भोईर अपात्र ठरल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेविका पूजा सचिन भोईर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर महानगरपालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का बसला असून, नगरसेविका पूजा सचिन भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. कोकण विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे अनुसूचित जमातीचे (ST) जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहीत समोर आली आहे. 
 
माहितीनुसार पूजा भोईर प्रभाग क्रमांक १ (ब) जागेवरून अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या जागेवर निवडून आल्या होत्या. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महापालिका आयुक्त यांनी पद रद्द केले. तसेच हा शिंदे गटाला उल्हासनगर महापालिकेत दुसरा मोठा धक्का आहे. यामुळे शिवसेनेची संख्या ३४ वर आली आहे आणि भाजप आता महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
 
ही घटना २७ जून २०२६ रोजी समोर आली आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली आहे. यामुळे शिंदे गटाला उल्हासनगरमध्ये सलग दोन नगरसेवकांचे पद गमवावे लागले.
उल्हासनगरमध्ये शिंदे गटाला बसलेला हा महिनाभरातील दुसरा मोठा झटका आहे. यापूर्वीच पक्षाचे आणखी एक डॅशिंग नेते आणि नगरसेवक यांचेही नगरसेवक पद अशाच प्रकारे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द झाले होते.  
 
या सलग दोन कारवायांनी उल्हासनगरच्या स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, रिक्त झालेल्या प्रभाग १ (ब) आणि प्रभाग ६ (अ) मध्ये आता पोटनिवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपीना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली