गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (10:11 IST)

मुंबईत आठ सिलेंडरचा मोठा स्फोट

गेल्या काही दिवासंपासून मुंबईतील अनेक भागांत आगीच्या घटना वाढत आहेत. त्यातच, आज सकाळी मुंबईमधील लालबाग काळाचौकी येथील साईबाबा नगरमध्ये एका शाळेत भीषण आग लागली आहे. साईबाबा नगरमध्ये 8  सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. संक्रांतीची सुट्टी असल्यानं शाळा बंद होती त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना अनर्थ टळला आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील साईबाब नगर परिसरात भीषण आग लागली. सात ते आठ घरगुती सिलिंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. हा दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शाळेत एक लग्नकार्याचा हॉल आहे, तिथं कैटरींगचा व्यवसाय चालतो. सिंलेडर त्यासाठीच तिथं ठेवल्याची शक्यता आहे.
 
अत्यंत मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे. परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आग विझवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
 
Edited By - Ratnadeep ranshoor