सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (11:29 IST)

Mumbai :8 महिला शिपायांवर 3 पोलिस अधिकाऱ्यांकडून बलात्कार

crime
मुंबई पोलिसदलाचे मोटार परिवहन विभाग नागपाडा येथे  8 महिला पोलीस शिपायांवर 3 अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या महिला पोलीस शिपायांनी 3 अधिकाऱ्यांकडून बलात्कार केल्याचा खबळजनक आरोप केला असून या 8 पैकी एका महिला पोलीस शिपायाने बळजबरी गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे देखील म्हटले आहे. तसेच या घटनेच्या वेळी व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप या महिला शिपायांनी केला आहे.  

मुंबईच्या नागपाडाच्या मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या 8 महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अधिकाऱ्यांनी या महिला शिपायांवर बलात्कार केला असून त्याचे व्हिडीओ देखील सामायिक करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला आणि एका महिला कर्मचारीला बळजबरी गर्भपात करायला भाग पडले. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली असून या संदर्भात चे पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठविले आहे .त्यात त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. तसेच त्या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Edited by - Priya Dixit