शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (20:52 IST)

महावितरणकडून वीज दरात मोठी वाढ, सर्वसामन्यांना मोजावे लागणार जास्त पैसे

electricity
महावितरणकडूनही वीज दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे.त्यामुळे आता सर्वसामन्यांना वीजेसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते.जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
 
मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी २०२२ मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट २५ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.
 
इंधन समायोजन आकाराची वाढ
० ते १०० युनिट आधी १० पैसे, आता ६५ पैसे
१०१ ते ३०० युनिट आधी २० पैसे, आता १ रुपये ४५ पैसे
३०१ ते ५०० युनिट आधी २५ पैसे, आता २ रुपये ०५ पैसे
५०१ युनिटच्या वर आधी २५ पैसे, आता २ रुपये ३५ पैसे