1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (17:00 IST)

विजेच्या टॉवरवर चढून गावकऱ्यांचे आंदोलन

बुलडाणातील ढालसावंगी गावातील नागरिक गेल्या तीन महिन्यापासून गावात अंधार असल्यामुळे हैराण झाले आहे. या गावाकडे महाराष्ट्र वीजवितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. गावात वीज मिळावी यासाठी गावकरांनी वीजवितरण कंपनी कडे तक्रार चे निवेदन दिले असून अद्याप या गावाकडे वीजवितरण कंपनीचे काही लक्ष नाही. ग्रामस्थानानी कंटाळून आणि चिडून तीव्र आंदोलनाची भूमिका घेत थेट विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. 

ढालसावंगी गावातील विजेचे तीन फिडर असून ते तीन महिन्यांपूर्वी जळाले आहे. ते बदलून देण्याची मागणी गावकरांनी केली होती. ते बदलले गेले नसल्यामुळे गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. गावात अंधार असल्यामुळे गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वीजमंडळ कार्यालयाच्या फेऱ्या करून देखील गावात अद्याप वीज आलेली नाही. या वर कठोर भूमिका घेत गावातील नागरिकांनी विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं आणि फिडर बदलून गावात वीज आली नाही तर मोठं आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.