बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (09:41 IST)

गेला होता मैत्रिणीला भेटायला, गावकऱ्यांनी लग्नच लावले

प्रेमासाठी लोक काहीपण करतात. आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी ख्रिसमस ला गेला आणि त्याला भेटायला जाणे महागातच पडले. त्याच्या सोबत असे काही घडले ज्याची त्याने कल्पना ही केली नसेल. गेला होता मैत्रीणीला भेटायला आणि गावकऱ्यांनी चक्क त्याचे लग्नचं लावून दिले .
ही  घटना घडली आहे बिहारमधील परशुरामपुरातील इथल्या गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीशी ओळख होऊन मैत्री झाली नंतर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. नेहमी प्रमाणे मुलगा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला. त्याची मैत्री आणि प्रेमाबद्दल गावकऱ्यांना कळले. त्यांना ते आवडले नाही. ख्रिसमसच्या दिवशी देखील हा मुलगा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र होऊन त्याला गाठले आणि चक्क त्या दोघांचे लग्नचं बळजबरीने लावून दिले. ते दोघे असं करू नका. अशी विनवणी करत होते. मात्र गावकरी काहीही ऐकायला तयार नव्हते. गावकऱ्यांच्या या कृत्याच्या विरोधात अल्पवयीन मुला - मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी गावकऱ्यांच्या विरोधात अल्पवयीन मुलं मुलीचे बळजबरी लग्न लावून दिल्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.