मोठी बातमी ! राज्यपाल कोश्यारींची पदमुक्त होण्याची इच्छा ?  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावरून पदमुक्त होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राज्यामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा जवळच्या व्यक्तींकडे केली असल्याची माहिती आहे.
				  													
						
																							
									  
	 
	गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  हे अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. शिवरायांबद्दल  त्यांनी २ वेळा वादग्रस्त वक्तव्य केले. सावित्रीबाई फुले यांच्याबाद्द्लही बोलताना राज्यापालंची जीभ घसरली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल केलेले वक्तव्य देखील राज्यपालांना चांगलेच भोवले होते. आताही शिवाजी महाराजांबद्दल दुसऱ्यांदा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात असंतोष पाहायला मिळाला. अजूनही त्याचे पडसाद उमटत आहे. आज नाशिकमध्ये विराट हिंदू मूक मोर्चामध्ये देखील शिवरायांविरोधात केलेल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले दिसले.
				  				  
	 
	दरम्यान आता या सर्व घडमोडी घडत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांचा पदभार त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्यात यावा अशीही इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली असल्याची वृत्तवाहिन्यांची माहिती आहे. तेच आपल्याला पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा आहे. असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	शिवाजी महाराज तर जुन्या काळाचे आदर्श आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभरात कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. कोश्यारींच्या काळ्या टोपीखाली सडका मेंदू आहे, अशी घणाघाती टीका देखील राजकीय वर्तुळातून समोर आली होती. या सर्व प्रकरणानंतर राज्यपालांकडून स्वत: हून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली जात असल्याची माहिती आहे.
				  																								
											
									  
	 
	आपल्याला आपल्या राज्यात परत जायचे आहे. आपला पदभार जवळच्या व्यक्तीवर सोपवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडूनच पदमुक्त होण्याचे संकेत मिळाले असं म्हणता येईल.
				  																	
									  Edited by : Ratnadeep Ranshoor