बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2023 (17:10 IST)

आषाढीसाठी रेल्वेची मोठी घोषणा

train
रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला दर्शनाकरिता जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.
 
जालना -पंढरपूर, पंढरपूर -नांदेड, औरंगाबाद - पंढरपूर, पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वेच्या 28 व 29 जून अशा दोन फेर्‍या होणार आहेत. 
 
त्यामध्ये भुसावळ-पंढरपूरसह, नागपूर-मीरज, नागपूर-पंढरपूर, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मीरज-पंढरपूर, मीरज-खुर्दूवाडी या गाड्यांचा समावेश आहे.
 
भुसावळ-पंढरपूर गाडीच्या 28 जूनला दोन फेर्‍या होतील. जळगाव, भुसावळ, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी ही गाडी थांबेल. नागपूर-मीरज गाडीच्या 25 आणि 28 जूनला चार फेर्‍या होतील. ही गाडी जळगाव, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव व अन्य स्थानाकांवर थांबेल.
 
नागपूर-पंढरपूर आणि नवी अमरावती-पंढरपूर या दोन्ही गाड्यांच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्‍या होतील. भुसावळ, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव आदी स्थानकांवर या गाड्या थांबतील. खामगाव-पंढरपूर या गाडीच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्‍या होतील. ही गाडी भुसावळ, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी थांबेल.