रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2018 (15:23 IST)

देश विदेशातील पक्षी पहा : नाशिकला बर्ड फेस्टिवल

नाशिकचे नांदूर माध्य्मेश्वर हे देशात प्रसिद्ध असे पक्षी अभयारण्य आहे. येथे देश आणि जगातून अनेक पक्षी येत असतात. हे सर्व पाहूनच देशभरात प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीन दिवसीय पक्षी संमेलनाची पर्वणी पक्षीप्रेमींना साधता येणार आहे. १९ ते 21 जानेवारीपर्यंत  चालणार्‍या या संमेलनासाठी परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नियमीत दराने नाशिक (सायखेडामार्गे) चापडगाव थेट बससेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. संमेलनासाठी वन्यजीव विभागाकडून http://www.birdfestival.nashikwildlife.com हे सविस्तर माहितीचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणामुळे येथे विविध पक्ष्यांची जैवविविधता दरवर्षी हिवाळ्यात पहावयास मिळते. यावर्षी प्रथमच नांदूरमध्यमेश्वच्या ब्रॅन्डिंगसाठी नाशिक वन-वन्यजीव प्रादेशिक विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. या तीन दिवसात सकाळ-संध्याकाळ अभ्यासकांसमवेत पक्षीनिरिक्षण शिवार फेरी काढली जाणार आहे. सकाळी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याविषयी माहितीपर व्याख्यान दिले जाणार पूर्ण माहिती देणार. दुपारच्या सत्रान पक्षी छायाचित्रण, निरिक्षणाविषयी तज्ञ्जांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. अभयारण्यात टिपलेल्या विविध छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना पक्षी निरीक्षण आणि त्यात पूर्ण शास्त्र शुद्ध माहिती हवी त्यांनी जरूर लाभ घेतला पाहिजे.