1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , मंगळवार, 9 जानेवारी 2018 (09:22 IST)

इम्रानने केला तिसऱ्या विवाहाचा इन्कार

imran khan
राजकारणी बनलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेट पटू इम्रान खान यांनी आपल्या तिसऱ्या विवाहाचा इन्कार केला आहे. इम्रान खान यांनी बुशरा मनेका नावाच्या महिलेशी गुप्त विवाह केल्याची माहिती नुकतीच प्रकाशित झाली होती त्याविषयी खुलासा करताना त्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले की इम्रान खान यांनी सदर महिलेला विवाहाचा प्रस्ताव दिला आहे. पण त्यांनी अजून लग्न केलेले नाही. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे असे सदर महिलेने इम्रान खान यांना सांगितले असल्याने अजून हे लग्न झालेले नाही.
 
एका ज्येष्ठ व्यक्तीविषयीची अशी निखालस खोटी बातमी वृत्तपत्रे कशी देऊ शकतात असावल सवालही त्यांच्या प्रवक्‍त्याने केला आहे. संबंधीत महिला ही सार्वजनिक जीवनात वावरणारी कोणी बडी महिला नाही. त्यामुळे त्यांच्याही खासगी आयुष्यावर या बातमीचा विपरित परिणाम झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांनी दोन्ही कुटुंबांच्या खासगी बाबींचा सन्मान करावा आणि या विषयी बातम्या देताना खात्री करण्याचा मार्ग अनुसरावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.