1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. BJP has no right to speak on Aurangabad renaming: Aditya Thackeray

औरंगाबाद नामांतरावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही : आदित्य ठाकरे

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद नामांतरावरून टोला लगावला आहे. सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही आणि आता बोलत आहेत ही भुमिका दुटप्पी आहे. औरंगाबाद नामांतरावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही. त्यांनी सत्ता असताना काही केलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी मुंबई विकासाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासासाठी सुरु असलेल्या योजनांचा आढावा घेतला. 
 
दुसरीकडे औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे. 
पुढील लेख
राज्यात बर्ड फ्लू नाही, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांची माहिती